Homeशेती विषयकरेशीम शेती | रेशीम उद्योग अनुदान 2023। तुती लागवडी बद्दल संपूर्ण माहिती

रेशीम शेती | रेशीम उद्योग अनुदान 2023। तुती लागवडी बद्दल संपूर्ण माहिती

रेशीम उद्योगाचे महत्व:

सध्याच्या काळात पारंपरिक शेतीमालाला मिळत असलेले भाव व त्यासाठी येणार खर्च पाहता शेतकऱ्याच्या हातात खर्च जात काहीच उरात नाही. अशातच शेतकऱ्यांना रेशीम शेती हा उद्योग महत्पूर्ण ठरतोय. महाराष्ट्रातील वातावरण तुतीची योग्य असून महाराष्ट्रात बाराही महिने तुटीचे उत्पादन घेणे शक्य आहे. रेशीम कोषाला सध्या दरही ४५० ते ८५० रुपये प्रतिकिलो मिळत आहे. महाराष्ट्र शासनही रेशीम उद्योगासाठी शेतकऱ्यांना अनुदान देत आहे(३. ५ लाख रेपया पर्यंत). त्यामुळे महाराष्ट्रातील तरुण वर्ग रेशीम उद्योगाकडे वळत आहे.

रेशीम उद्योग साठी अनुदान :

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी या योजने अंतर्गत १ एकर तुती लागवडी साठी २ लाख रुपारे अनुदान राज्य सरकार देते. हे अनुदान शेतकऱ्यांना तुती लागवड, रोपे, खाते, औषधे, यासाठी ३ वर्षात विभागून दिले जाते.

किटक संगोपन गृह: रेशीम शेती कीटक संगोपन गृह (तुती शेड ) बांधकामासाठी ९२ हजार रुपये अनुदान देण्यात येते.
या योजनेत लाभ घेण्यासाठी मात्र, लाभार्थी यांचेकडे जॉब कार्ड असणे आवश्यक आहे.

अनुदानासाठी आवश्यक कागदपत्रे:

रेशीम शेती अनुदानाचा लाभ घेण्यासाठी सातबारा उतारा, 8 अ, राष्ट्रीयकृत बॅंकेच्या पासबुकची झेरॅाक्स, आधार कार्डची झेरॅाक्स, मतदान ओळखपत्र, मनरेगाच्या जॅाबकार्डची झेरॅाक्स आणि पासपोर्ट साईजचे दोन फोटो हे रेशीम उद्योग कार्यालयात जमा करावे लागणार आहेत.

अनुदानासाठी असा करा अर्ज:

सर्व प्रथम रेशीम संचालनालयाची www.mahasilk.maharashtra.gov.in या वेबसाईट वर साईन अप मध्ये New user वर क्लिक करून I Agree केल्यानंतर Stake Holder मध्ये – Farmer – Mulberry/Tasar वर क्लीक करावे. त्यानंतर शेतकऱ्यांनी सर्व माहिती भरून शेवटी स्वतः चा पासपोर्ट साईजचा फोटो, आधार कार्ड व बँक पास बुक ची फोटो कॉपी Upload करावी. शेवटी Submit केल्यानंतर शेतकऱ्याचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन झाल्याचे कॉम्पुटर च्या screen वर sms येईल. ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर संबंधित जिल्हा रेशीम कार्यालयास जाऊन 7/12, 8 अ, बँकेच्या पहिल्या पानाची झेरॉक्स, जॉब कार्ड हे नोंदणी शुल्कासह देऊन नोंदणी पूर्ण करावी.

तुती लागवडी (रेशीम शेती) साठी हवामान व जमीन:

महाराष्ट्रातील हवामान तुती लागवडी साठी योग्य आहे. ७५० ते १००० मिली .मी पाऊस पडत असलेल्या भागात तुती लागवड काटा येते. २५ ते ३० तापमान असलेल्या भागात तुटीचे उत्पादन चांगल्या प्रमाणात होते.

तुती लागवडीसाठी हलकी, माध्यम, भारी स्वरूपाची जमीन चालते . डोंगर उताराची व खारट जमीन म्हणजेच ज्या जमीनीत पानी साचून राहते किंवा पाण्याच निचरा होत नाही अशी जमीन तुती लागवडीसाठी आयोग्य असते. कारण अशा जमिनीत तुती कलमांची लागवड केली तर कलमे जास्त ओलाव्या मुळे कुजून खराब होतात. पाण्याचा चांगल्या प्राकरे निचरा होणाऱ्या जमीनीतच तुती लागवड करावी.कोणत्याही प्रकारच्या जमीनीत तुती लागवड करता येत असली तरी देखील काळया कसदार मातीत तुती झाडाची वाढ अतिशय झपाटयाने होत असल्याचे आढळून आले आहे.तुती झाडाच्या वाढीसाठी जमीनीतील सामु (पी.एच.) हा 6.5 ते 7 पर्यंत असणे योग्य असतो.

तुतीच्या प्रचलीत व सुधारीत जाती (अधिक माहिती वाचा ):

तुती लागवड

तुती

तुती बेणे तयार करणे:

तुती लागवड हि तुती च्या काड्यांपासून करतात. यासाठी तुतीच्या ६-ते ८ महिने वयाच्या झाडांची फांदी वापरावी. बेणे तयार करताना ६ ते ८ इंच तुकडे करावेत त्यावर किमान ३ ते ४ डोळे असावेत व तुकडे करताना धारदार कोयते किंवा कटर वापरावे . बेटे तोडताना साल निघू देऊ नये.

तुती बेण्यावरील रासायनीक प्रक्रिया:

  • तुती कलमे तयार केल्यानंतर जमीनतली वाळवी/ उधळी, बुराशी रोगापासून बेण्याचे नुकसान होऊ नये यासाठी:
  • थॉयमेटच्या 1 टक्के द्रावणात कलमे 4 ते 5 तास बुडवून ठेवावेत.
  • बुरशी नाशक बाव्हिस्टिन, कॅप्टॉन यांचे 1 टक्के द्रावणात तुती बेणे 4 ते 5 तास बुडवून ठेवाव्यात.
  • तुती झाडाचा लवकर मुळे फुटावीत या करिता रुटेक्स पावडर किंवा कॅरडॉक्स पावडर बेण्याच्या खालच्या भागास लावावी त्यामुळे लवकर मुळे फुटून झाडांची जोमदार वाढ होईल.

तुतीचे लागवड अंतर:

रेशीम शेती : झाडांमधील आंतर
रेशीम शेती : झाडांमधील आंतर

तुती लागवड करताना झाडांमधील आंतर किती ठेवावे हा प्रश्न पडतोच. माझ्या वैयक्तिक मताने झाडांमधील आंतर हे आपल्या जमिनीवर आवलंबून आसले पाहिजे . म्हणजे जर आपली जमीन चांगल्या स्वरूपाची काळी माती असलेली असेल तर झाडांमधील आंतर हे ५**२*१ एवढे ठेवले तर झाडांची वाढ योग्य पद्धतीने होईल. जर जमीन हल्या स्वरूपाची असेल तर झाडांची वाढ माध्यम स्वरूपाची होते तासाठी आपण झाडांमधील आंतर कमी ठेऊ शकतो (३*१). आंतर मशागत करण्यासाठी सोईचे असेल असे आंतर ठेवा.

तुती लागवड करतांना घ्यावयाची काळजी:

  • तुती लागवडी करीत किमान सहा महिने वयाचे बेणे वापरावे.
  • बेणे चटणी केल्यापासून १२ तासात लागवड करावी त्यामुळे फुटवा चांगल्या प्रमाणात होतो.
  • तुतीची काडी लावताना 3 डोळे जमिनीत व एकच उभा डोळा जमीनीवर ठेवावा. उलटी काडी लावू नये.
  • जमिनीत वाळवी व बुरशीचा प्रादूर्भाव असल्यास तुती बेण्यास क्लोअरपायरीफॉस, बावीस्टीन / डायथेन एम-4 अथवा कॉपर ऑक्सी क्लोराईड यांची बेणे प्रक्रिया करुनच लागवड करावी.
  • लागवड करातांना कॅरेडिक्स,रुटेक्स किंवा आय.बी.ए. इत्यादीचा वापर करवा.
  • तुती लागवडीमध्ये नैसर्गिकरित्या 10 ते 15 % तुती अळी पडत असल्याने प्रती एकर किमान तुट अळी भरण्यासाठी 1000 रोपांची वेगळी रोपवाटीका करावी.

तुती बागेची आंतर मशागत:

तुती कलमांची लागवड केल्यानंतर 1 महिन्याने खुरपणी /निंदणी करुन गवत/तन काढावे.
प्रत्येक पीकानंतर उपलब्ध साधन व अंतरानुसार बैलजोडी अथवा टॅक्टरने अंतर मशागत करावी.

तुती झाडांची छाटणी:

तुती झाडांच्या छाटणी करीता प्रमु’याने सिकॅटरचा वापर केला पाहिजे. प्रथम वर्षी पहीले पीकझाल्यानंतर सिकॅटरच्या सहाय्याने झाडावर निवडक तीन फांद्या ठेऊन (त्रिशुल) बागायती क्षेत्रा करीता जमिनीपासुन 25 ते 30 सेमी. वर छाटणी करावी.आडव्या फांद्या खोडापासूनच काढून टाकाव्यात.नंतर 1 वर्ष प्रत्येक पीकानंतर झाडावर सरळ वाढणाऱ्या 7 ते 8 फांद्याची दोन डोळयावर छाटणी करुन उर्वरीत फांद्या काढून टाकाव्यात. दिड ते दोन वर्षानंतर तुती झाडाची जमिनीलगत छोटया करवतीच्या सहाय्याने कापणी करावी. अशा प्रकारे छाटणी केल्यानंतर तुती झाडापासुन सकस व भरपुर पाला मिळतो.

तुतीबागेस सिंचन:

जुलै ते नोव्हेंबर – महिन्याच्या दरम्यान केलेल्या लागवडीस पावसाच्या पाण्याचा फायदा मिळतो परंतू आपल्याकडे दरवर्षी पाऊस अनियमित पडत असल्यामुळे तुती कलमांचे नुकसान होत व त्यामुळे तुती कलमांची लागवड केल्यानंतर पाऊस कमी पडल्यास किंवा 10 ते 12 दिवसाचा खंड पडल्यास विहिरीचे पाणी देवून कलमे जगतील याची काळजी घ्यावी.

RELATED ARTICLES

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Catagories

Most Popular