Homeशेती विषयकअर्ज सुरू | कुसुम योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन महाराष्ट्र | कुसुम सोलर पंप...

अर्ज सुरू | कुसुम योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन महाराष्ट्र | कुसुम सोलर पंप योजना 2024 महाराष्ट्र Online Registration माहिती

नमस्कार, शेतकरी बांधवानो आज आपण प्रधानमंत्री कुसुम योजनेच्या ऑनलाइन रजिस्ट्रेशन विषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. मित्रांनो कुसुम सोलर पंप योजना 2024 चा तुम्हालाही लाभ घेयचा असेल, आणि solar pump मिळवायचा असेल, तर हा लेख तुमच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे. या लेखामध्ये आपण कुसुम योजना काय आहे, लाभार्थी पात्रता, त्यासाठी आवश्यक कागदपत्रे, PMKY 2024 योजनेचे लाभ कोणते, अर्जासाठी फीस किती भरावी लागते,कुसुम सोलर कृषी पंप योजना महाराष्ट्र 2024 साठी अर्ज कसा करायचा, जर काही अडचण आली तर निवारण्यासाठी हेल्पलाईन नंबर इत्यादी सर्व गोष्टींची माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

सौर कृषी पंप अर्ज कसा भरावा ?

कुसुम महाऊर्जा पोर्टल ( Kusum Solar )अंतर्गत सौर पंपासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या चालू आहे. महाऊर्जा पोर्टल वर शेतकरी जवळच्या ग्राहक  सेवा केंद्र वर जाऊन फॉर्म भरू शकतात.

कुसुम योजना महाराष्ट्र 2024 चे उद्देश

कुसुम सोलर पंप ही योजना वित्त मंत्री श्री अरुण जेटली यांच्या कल्पनेतून चालू केलेली केंद्र सरकारची योजना आहे. केंद्र सरकारचे या योजनेमागचे मुख्य उद्दिष्टय एवढेच आहे कि, कमीत कमी खर्चात सोलार कृषी पंप शेतकऱ्यांना उपलब्ध करून  देणे.

या योजनेत एकूण खर्च तीन हिस्स्यांमधें विभागला गेला आहे. ज्यामध्ये केंद्र सरकार शेतकऱ्यांना मदत करणार आहे. ते खालीलप्रमाणे आहेत.

  • सरकार शेतकर्‍यांना ६०% अनुदान देईल
  • ३०% खर्च सरकार कर्ज स्वरूपात देईल.
  • शेतक्यांना एकूण खर्चाच्या केवळ १०% रक्कम भरावी लागेल.

या योजनेअंतर्गत सोलार पॅनेल मधून तयार होणारी वीज शेतकरी विकू शकतो.

1 Feb 2024 कुसुम सोलर पंप योजना अपडेट | Kusum Solar Pump Yojana Maharashtra 2024 Online Apply महाऊर्जामार्फत राज्यातील. महाकृषी ऊर्जा अभियान पीएम कुसूम घटक बी. योजनेच्या पुढील टप्प्याअंतर्गत सौर कृषीपंप अन् करीता. महा ऊर्जा ऑनलाइन पोर्टलवर अर्ज भरण्यासाठी ऑनलाइन दिनांक 1 Feb 2024 रोजीपासून सुरू करण्यात आलेला आहे. पीएम कुसुम योजने अंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनी. क्षेत्रानुसार व इतर पात्रतेच्या अटींनुसार. 3.5 व 7.5 एचपी डीसी क्षमतेची पारेषण विरहित सौर कृषिपंप आस्थापित करण्यात येतात. त्याबाबत लाभार्थी हिस्सा खाली दिल्याप्रमाणे प्रमाणे भरावा लागणार आहे.

नोट: महाऊर्जा पोर्टल वर जास्त शेतकरी अर्ज करण्यासाठी येत आहेत त्यामुळे हे पोर्टल बंद होत आहे. परंतु रात्रीच्या वेळी हे पोर्टल व्यवस्तीत सुरु असू शकते त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळोवेळी हे पोर्टल चालू आहे कि नाही हे चेक करत राहावे आणि आपला फॉर्म भरून घ्यावा.

कुसुम योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन महाराष्ट्र 2024 सौर कृषी पंप लाभार्थी निवडीचे पात्रता निकष कोणते?

  • अटल सोलर कृषी पंप योजना किंवा मुख्यमंत्री सोलार कृषी पंप योजने मध्ये केलेले अर्ज अद्याप मंजूर न झालेले अर्जदार
  • विहीर, बोरवेल, बारमाही वाहणारी नदी किंवा शेजारील, शेततळे तसेच पाण्याचा शाश्‍वत स्रोत उपलब्ध असणारे शेतकरी अर्जासाठी पात्र असतील.
  • ज्या शेतकऱ्यांना पारंपरिक वीज कनेक्शन उपलब्ध नाही असे शेतकरी या योजनेअंतर्गत अर्जासाठी पात्र असतील.
  • २.५ एकर शेतजमीन असणारे शेतकरी HP DC, ५ एकर शेत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना HP DC, ५ एकर पेक्षा जास्त असणाऱ्या शेतकऱ्यांना ७.५  HP DC तसेच अधिक क्षमतेचे सौर कृषी पंप यांसाठी अनुदान देय असेल.

कुसुम योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन महाराष्ट्र 2024 चे वैशिष्ट्य काय?

  • ३८१४ कृषी पंपाची महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यात वितरण करण्यात येणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा शेताला पाणी देणे शक्य होणार आहे.
  • सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांचे कृषि पंप किमतीच्या १० % तर अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना ५ % लाभार्थी हिस्सा भरावा लागेल.
  • शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीनुसार ३ एचपी, ५ एचपी, ७.५ एचपी डीसी सोलार पंप अर्ज केल्यानंतर मिळणार आहेत.

PM कुसुम योजना 2024 महत्वाची संकेतस्थळ –

पंतप्रधान कुसुम योजना महाराष्ट्र 2024 लाभ –

  • शेतकऱ्यांना प्रधान मंत्री कुसुम योजनेचे लाभ खालील प्रमाणे आहेतः
  • शेतकर्‍यांना अखंडित वीजपुरवठा पुरवतो.
  • शेतकर्‍यांच्या शेती उर्जा अनुदानाचा भार कमी करते.
  • भूजल अतिरेक तपासणीची क्षमता
  • शेतकर्‍यांना जोखीम-मुक्त उत्पन्न प्रदान करते.
  • शेतीत कार्बन फूटप्रिंट कमी करण्यास मदत करते.

कुसुम योजनेच्या अर्जासाठी आवश्यक पात्रता

  • अर्जदार हा भारताचा कायम रहिवासी असावा.
  • सदर योजने अंतर्गत, स्वयं-गुंतवणूकीद्वारे प्रकल्पासाठी कोणतीही आर्थिक पात्रता आवश्यक नाही.
  • अर्जदार त्याच्या शेतीच्या क्षेत्रानुसार किंवा वितरण महामंडळाद्वारे अधिसूचित केलेल्या क्षमता (जे कमी असेल) च्या प्रमाणात २ मेगावॅट क्षमते साठी अर्ज करु शकतो.
  • सदर योजने अंतर्गत शेतकरी ०.५ मेगावॅट ते २ मेगावॅट क्षमतेच्या सोलार पंपासाठी अर्जदार अर्ज करु शकतात.
  • जर प्रकल्प विकस कामार्फत अर्जदाराद्वारे विकसित केला जात असेल, तर विकसकाची निव्वळ किंमत प्रति मेगावॅट १ कोटी रुपये आहे.
  • प्रति मेगावॅट २ हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे.

कुसुम योजनेचे लाभार्थी

  • शेतकरी
  • सहकारी संस्था
  • शेतकर्‍यांचा गट
  • जल ग्राहक संघटना
  • शेतकरी उत्पादक संस्था

कुसुम योजना महाराष्ट्र 2023 महत्वाची कागदपत्रे –

  • आधार कार्ड
  • पासपोर्ट साईझ फोटो
  • रेशन कार्ड
  • नोंदणी प्रत
  • प्राधिकरण पत्र
  • जमीन प्रत
  • मोबाइल नंबर
  • बँक खाते विवरण

कुसुम योजना अर्ज फी –

या योजनेंतर्गत अर्जदारास सोलार उर्जा पंपासाठी अर्ज करण्यासाठी प्रति मेगावॅट ₹ ५००० आणि जीएसटी भरावा लागेल.  ०.५  मेगावॅट ते २ मेगावॅट पर्यंतच्या अर्जांचे अदा करावयाची शुल्क खालीलप्रमाणे असणार आहे. हि फीस म्हणजेच अर्जाची फी मेगावॅट नुसार आकारली जाणार आहे, ती खालील दिलेली आहे. 

  • ०.५ मेगावॅट साठी रु. २,५०० + जीएसटी
  • १ मेगावॅट रु. ५,००० + जीएसटी
  • १.५  मेगावॅट रु. ७,५०० + जीएसटी
  • २ मेगावॅट रु. १०,००० + जीएसटी

हेल्पलाइन नंबर

या ब्लॉग  मध्ये आम्ही आपल्याला प्रधान मंत्री कुसुम योजनेशी संबंधित महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जर आपणास अजुनहि या योजने संबंधित काही समस्या असेल, तर आपण कुसुम योजनेच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकताआणि तुमच्या शंकांचे निवारण करू शकता. त्यासाठी सदर योजनेची वेबसाइट https://mnre.gov.in/ आहे , याला अवश्य भेट द्या.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Catagories

Most Popular